आष्टा पोलीस ठाण्यात कर्मचारी वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:26 IST2021-04-25T04:26:26+5:302021-04-25T04:26:26+5:30
आष्टा : आष्टा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री ...

आष्टा पोलीस ठाण्यात कर्मचारी वाढवा
आष्टा : आष्टा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण येत असल्याने शहरातील पोलिसांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.
याबाबत जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप वग्याणी, राजारामबापू कारखान्याचे संचालक विराज शिंदे, माजी उपनगराध्यक्ष विजय मोरे, रघुनाथ जाधव, राजारामबापू दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे, दीपक मेथे-पाटील, प्रभाकर जाधव, रामचंद्र सिद्ध, शिवाजी ढोले यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आष्टा शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारांच्या दरम्यान आहे. शहरातील पोलीस ठाणे ब्रिटिशकालीन आहे. पोलिसांची संख्या ६० होती, मात्र सध्या ४० पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. परिसरातील सुमारे २४ गावांचा कारभार आष्टा पोलिसांकडे येत असल्याने पोलिसांवर ताण पडत आहे. त्यात कोरोनाचे संकट सुरू आहे. त्यामुळे शहरातील पोलीस व अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी. पोलिसांची निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. निवासाची व्यवस्था करण्यात यावी.