इस्लामपुरात सावकाराच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:34+5:302021-08-13T04:30:34+5:30

इस्लामपूर : शहरातील बेघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या युवकाला उसने दिलेल्या पैशाचे व्याज मागत त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविणाऱ्या सावकाराच्या पोलीस कोठडीत ...

Increase in police custody of moneylenders in Islampur | इस्लामपुरात सावकाराच्या पोलीस कोठडीत वाढ

इस्लामपुरात सावकाराच्या पोलीस कोठडीत वाढ

इस्लामपूर : शहरातील बेघर वसाहतीमध्ये राहणाऱ्या युवकाला उसने दिलेल्या पैशाचे व्याज मागत त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला चढविणाऱ्या सावकाराच्या पोलीस कोठडीत येथील न्यायालयाने आणखी दोन दिवसांची वाढ केली. रोहित ऊर्फ बारक्या पंडित पवार (रा. इस्लामपूर) असे पोलीस कोठडी मिळालेल्या सावकाराचे नाव आहे. त्याचा साथीदार पंकज मुळीक फरार आहे. हा प्रकार शनिवारी (दि. ७) घडला होता.

याबाबत आदित्य आप्पासाहेब कांबळे (वय १९, रा. बेघर वसाहत) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. रोहित पवार आणि पंकज मुळीक या दोघांनी त्यांच्याकडे व्याजाच्या पैशाची मागणी करीत त्यांच्या खिशातील १५०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर शिवीगाळ करीत त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने हल्ला केला. पोलीस निरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Increase in police custody of moneylenders in Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.