बोरगावात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:31+5:302021-06-10T04:19:31+5:30

बुधवारी बोरगाव परिसरात १४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात बोरगाव केंद्रात तीन, ताकारी-दुधारी उपकेंद्रात दोन, जुनेखेड उपकेंद्रात एक, मसुचीवाडी ...

Increase in the number of corona patients in Borgaon | बोरगावात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

बोरगावात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ

बुधवारी बोरगाव परिसरात १४ कोरोना रुग्ण सापडले आहेत. यात बोरगाव केंद्रात तीन, ताकारी-दुधारी उपकेंद्रात दोन, जुनेखेड उपकेंद्रात एक, मसुचीवाडी उपकेंद्रात दोन, साखराळे उपकेंद्रात चार अशी १४ रुग्णसंख्या आहे.

या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत नऊ गावांचा समावेश होतो. चार उपकेंद्रे आहेत. परिसराची लोकसंख्या ३० हजार ७३५ आहे. एवढा मोठा विस्तार असताना या आरोग्य केंद्रात कमी अनुभवी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. नुकतेच उत्तीर्ण झालेले डाॅक्टर भरले आहेत. दोन्ही वैद्यकीय अधिकारी महिलाच आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर त्यांचा वचक नाही. आरोग्य केंद्रात बसून संपूर्ण कारभार हाताळला जातो. पूर्वी याच आरोग्य केंद्रात दैनंदिन ३५० च्या आसपास रुग्णांची तपासणी केली जात होती. ती सध्या ७० पर्यंत घटली आहे. गावातील व परिसरातील गृह विलगीकरण व विलगीकरण कक्षाकडे अधिकारी फिरकत नाहीत. आशा सेविकांनीच आजअखेर घरोघरी जाऊन सेवा केली आहे.

Web Title: Increase in the number of corona patients in Borgaon