पीक कर्जाची मर्यादा वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:10+5:302021-06-16T04:36:10+5:30
शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी वाढली सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त ...

पीक कर्जाची मर्यादा वाढवा
शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी वाढली
सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाल्यामुळे जिल्हा परिषद, महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची कामानिमित्त गर्दी वाढली आहे. या गर्दीमुळे कोरोनाचा पुन्हा फैलाव वाढण्याचा धोकाही आहे. अनेकजण विनामास्कचेच फिरत आहेत. या नागरिकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.
जिल्हा परिषद परिसरातील खड्डे भरा
सांगली : जिल्ह्यातील विकासकामे करण्याच्या व्यापामध्ये जिल्हा परिषद परिसरातील मोठ्या खड्ड्यांचा प्रशासनाला विसर पडला आहे. सोमवारी या खड्ड्यातून गाडी गेल्यानंतर तेथील दगड जोरात उडून एका व्यक्तीला लागला. पण, मोठी दुखापत न झाल्यामुळे बरे, नाहीतर मोठा प्रसंग ओढवला असता. पावसाळ्यातही या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास होणार असल्यामुळे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
सांगली : जिल्ह्यात खरीप पेरणीपूर्व मशागती करुन पेरणीसाठी सज्ज आहे. मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या थांबविल्या आहेत. भात, ज्वारी, सोयाबीन, कडधान्याची मोठ्या प्रमाणात पेरणी होती. खरीप हंगाम अगदी काही दिवसांवर आला असल्याने शेतकऱ्यांनी कोरोनाच्या दहशतीमध्येच मशागतीची कामे सुरू केली आहेत.