जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ, नवे २४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:49 IST2021-03-04T04:49:26+5:302021-03-04T04:49:26+5:30

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे २४ कोरोना रुग्ण आढळून आले, तर सहाजणांनी कोरोनावर मात केली. मिरज तालुक्यातील एका ...

Increase in corona patients in the district, new 24 | जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ, नवे २४

जिल्ह्यात कोरोना रुग्णात वाढ, नवे २४

सांगली : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात नवे २४ कोरोना रुग्ण आढळून आले, तर सहाजणांनी कोरोनावर मात केली. मिरज तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या १८३ रुग्ण उपचाराखाली असून, त्यातील ४६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

महापालिका क्षेत्रात मंग‌ळवारी सांगलीत ५, तर मिरजेत ४ रुग्णांची नोंद झाली. तासगाव, जत आणि वाळवा तालुक्यात प्रत्येकी दोन, तर खानापूर तालुक्यात ६ रुग्ण आढळले. कवठेमहांकाळ, मिरज आणि शिराळा तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. आटपाडी, कडेगाव, पलूस या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही.

दिवसभरात आरटीपीसीआरच्या ७०६ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १२ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. अँटिजेनच्या १००७ चाचण्यांत १३ रुग्ण सापडले. मिरज तालुक्यातील एका रुग्णाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या ४६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनवर ३२, हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर ७, तर नाॅन इन्व्हेझिव व्हेंटिलेटरवर ६ रुग्ण आहेत, तर सातारा जिल्ह्यातील एक रुग्ण उपचारासाठी दाखल झाला असून, परजिल्ह्यांतील १४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: Increase in corona patients in the district, new 24