कोरोना बाधितांत वाढ; तरीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:53+5:302021-04-02T04:26:53+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असून पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फाेटाची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोना ...

कोरोना बाधितांत वाढ; तरीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमीच
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ चिंताजनक असून पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फाेटाची शक्यता व्यक्त होत आहे. कोरोना उपाययोजनांसाठी आवश्यक असलेले कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या दहा दिवसात एकाचवेळी रुग्णांची वाढ होत असताना त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची यादी करण्यासाठीचे काम ग्रामीण भागात समाधानकारक होत असलेतरी शहरात त्यास अडचणी येत आहे. त्यामुळे सध्यातरी अपेक्षित असलेल्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे उद्दिष्ट गाठण्यात अडचणी येत आहेत.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० लोकांना शोधून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना उपाययोजनेचे काम व ट्रेसिंग देण्यासाठी बाधितांच्या कुटुंबांकडूनच अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
चौकट
रोज सरासरी हजार चाचण्या
१) पंधरवड्यापर्यंत पूर्णपणे नियंत्रणात असलेला कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत आहे. त्यामुळे एकाचवेळी संसर्ग रोखण्यासह चाचण्यांचे प्रमाण वाढवून बाधितांवर उपचारासाठी प्रशासनाने प्रयत्न चालू केले असलेतरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा अडसर कायम आहे.
२) सध्या प्रशासनाच्या वतीने आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेनच्या सरासरी ९०० ते ११०० चाचण्या घेण्यात येत आहेत. यातील सरासरी २०० जणांना नव्याने कोरोनाचे निदान होत आहे.
३) जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढला होता त्यावेळी सरासरी १६०० ते दोन हजारपर्यंत चाचण्या करण्यात येत होत्या. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले आहेत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आव्हानच
१) मिरज शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाची बाधा झालेल्या एका व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या नियमित आरोग्य तपासणी व माहितीसाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाणीचा प्रकार घडला. सध्यातरी शहरी भागात अनेक रुग्णांचे नातेवाईक कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अपेक्षित प्रतिसाद देत नाहीत.
२) शहरात राहण्यास असलेले अनेकजणांचा पत्ता वेगळा असतो. नेमका त्याचा फायदा घेत अनेक बाधित वेगळ्याच ठिकाणी होम आयसोलेशनमध्ये राहतात. चाचणी घेतेवेळी दिलेल्या पत्यावर ते राहत नसल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना यादी बनवता येत नाही. अशाही तक्रारी वाढत आहेत.
कोट
कोरोनाचा संसर्ग वाढत असलातरी नियंत्रणासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. एका रुग्णाच्या किमान २० जणांच्या तपासणीचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या याचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे बाधितांवर उपचार करणेही सोयीस्कर होत आहे.
डॉ. मिलिंद पाेरे, जिल्हा आरोग्य अधिकारी