चरण ते सोडोली पूल बंदमुळे शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:28 IST2021-05-27T04:28:49+5:302021-05-27T04:28:49+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन जिल्ह्यातील संपर्क बंद करण्यासाठी चरण ते सोडोली पुलावरील वाहतूक बंद केली आहे. शासनाचा निर्णय नाही, तरीही ...

Inconvenience to the citizens of Shahuwadi taluka due to closure of Charan to Sodoli bridge | चरण ते सोडोली पूल बंदमुळे शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांची गैरसोय

चरण ते सोडोली पूल बंदमुळे शाहूवाडी तालुक्यातील नागरिकांची गैरसोय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन जिल्ह्यातील संपर्क बंद करण्यासाठी चरण ते सोडोली पुलावरील वाहतूक बंद केली आहे. शासनाचा निर्णय नाही, तरीही स्थानिक प्रशासनाने निर्णय घेतल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे. कोरोना रोखण्यासाठी हा निर्णय असला तरी जवळच्या गावांसाठी तो अडचणीचा ठरत आहे. खरीप हंगामातील बियाणे, खते खरेदीसाठीची सोडोली ग्रामस्थांची अडचण झाली आहे. चरण जवळचे गाव असूनही या ग्रामस्थांना दहा ते पंधरा किलो मीटर अंतरावर साहित्य खरेदीला जावे लागत आहे.

चरणचे सरपंच मिलिंद घोलप म्हणाले, चरण ते सोडोली पूल बंद करण्याचा प्रशासनाचा आदेश नाही, तरीही स्थानिकांनी बंद केला आहे. या निर्णयामुळे जवळच्या दोन गावांची अडचण होत आहे. याबाबत कोकारुड पोलीस ठाण्याशी बोलून पुलावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Web Title: Inconvenience to the citizens of Shahuwadi taluka due to closure of Charan to Sodoli bridge