शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून संख येथील घटना : झोपेतच हल्ला; कुºहाडीचे वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:51 IST

अनैतिक संबंधातून संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय २५) या तरुणाचा गाढ झोपेत असताना कुºहाडीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आला.

ठळक मुद्देसंशयितास अटक- मध्यरात्री सिद्धगोंडा तेथे येऊन झोपल्यानंतर करजगी याने त्याचा खून केला

संख : अनैतिक संबंधातून संख (ता. जत) येथील सिद्धगोंडा पराप्पा बिरादार (वय २५) या तरुणाचा गाढ झोपेत असताना कुºहाडीने गळ्यावर वार करुन निर्घृण खून करण्यात आला. मंगळवारी सकाळी आठ वाजता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित हल्लेखोर धर्माण्णा बिराप्पा करजगी (२६, रा. संख) यास उमदी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने या खुनाची कबुली दिली आहे.

संख येथील मध्यम प्रकल्पाच्या तलावाजवळील व्हनगोंड वस्तीवरील शेतात सिद्धगोंडा बिरादार हा आई-वडील व भाऊ यांच्यासमवेत राहत होता. काही महिन्यांपूर्वी बिरादार कुटुंबियांनी नवीन घराचे बांधकाम सुरु केले आहे. सिध्दगोंडा रात्री नवीन बांधकामावर मुक्कामास जात असे. सोमवारी नवरात्रीनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी सिद्धगोंडा गावात गेला होता. कार्यक्रम संपल्यावर मध्यरात्री एक वाजता तो शेतातील नवीन घरात झोपला. दरम्यान, तो गाढ झोपेत असताना त्याच्या मानेवर हल्ला करण्यात आला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी बांधकामासाठी कामगार आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, सहायक निरीक्षक भगवान शिंदे, उपनिरीक्षक प्रवीण सपांगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सिद्धगोंडा बिरादार याचे संशयित धर्माण्णा करजगी याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. करजगीला याची कुणकुण लागल्यानंतर त्याने सिद्धगोंडाला समजावून सांगितले होते. पण तरीही त्याने करजगीच्या पत्नीशी संबंध सुरुच ठेवले. यातून दोघांत अनेकदा वाद झाला होता. सोमवारी सायंकाळी दोघांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर करजगी याने सिद्धगोंडाला जिवंत ठेवायचे नाही, असा निर्णय घेतला. तो बांधकामावर झोपण्यास जातो, हे त्याला माहिती होते. त्यानुसार तो तेथे कुºहाड घेऊन दबा धरुन बसला. मध्यरात्री सिद्धगोंडा तेथे येऊन झोपल्यानंतर करजगी याने त्याचा खून केला. त्याला बुधवारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.कुºहाड कूपनलिकेतसिद्धगोंडचा खून केल्यानंतर करजगी याने रक्ताने माखलेली कुºहाड एका कूपनलिकेत फेकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. कूपनलिका खुदाई करणाऱ्या कामगारांची मदत घेऊन या कुºहाडीचा शोध सुरु ठेवला आहे. पण रात्री उशिरापर्यंत ती सापडली नव्हती. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी सुरु असल्याचे सहायक निरीक्षक भगवान शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली