खरसुंडीच्या शाळेत पाण्याच्या टाकीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:17+5:302021-03-13T04:49:17+5:30
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी गिरजाबाई दौलता पुजारी यांच्या स्मरणार्थ ...

खरसुंडीच्या शाळेत पाण्याच्या टाकीचे उद्घाटन
खरसुंडी : खरसुंडी (ता. आटपाडी) येथील श्री सिद्धनाथ विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी गिरजाबाई दौलता पुजारी यांच्या स्मरणार्थ माजी सरपंच चंद्रकांत पुजारी, गजानन पुजारी व प्राचार्य रवींद्र पुजारी यांच्यातर्फे देणगी स्वरूपात बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन प्रा. दिगंबर पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर विद्यालयास देणगीतून सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभाग सल्लागार विलासनाना शिंदे, माजी सरपंच अर्जुन सावकार, माजी सरपंच अंजली पुजारी, बाजार समितीचे माजी संचालक दिलीप सवणे, भरत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडीराम इंगवले, मोहननाना शिंदे उपस्थित होते.