कासेगाव येथे वाळवा तालुका पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:20 IST2021-02-05T07:20:38+5:302021-02-05T07:20:38+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्याचे पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन कासेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले. यावेळी वाळवा पंचायत ...

कासेगाव येथे वाळवा तालुका पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन
इस्लामपूर : वाळवा तालुक्याचे पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन कासेगाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाले. यावेळी वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील, जिल्हा परिषद सदस्य संगीताताई पाटील, राज्य कुटुंब कल्याण संचालक मंडळ पुणेचे सहा. संचालक डॉ. राम हंकारे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, कासेगावचे सरपंच किरण पाटील उपस्थित होते.
डॉ. राजेंद्र भिसे यांनी स्वागत केले. यावेळी डॉ. ऋतुल रासकर, महावीर उगारे, मंगल कांबळे, रवींद्र जाधव, प्रियांका कांबळे, शशिकांत सन्मुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जमलेल्या एक दिवसाच्या बाळाला पोलिओचा डोस पाजून करण्यात आले. सहा. संचालक डॉ. राम हंकारे हे राज्यस्तरावरून प्रतिनिधी म्हणून सांगली जिल्ह्यासाठी आले आहेत. सांगली जिल्ह्यातील पल्स पोलिओ लसीकरणबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचे कामकाज पाहणार आहेत.
वाळवा तालुक्यामध्ये एकूण २६ हजार ५९७ इतक्या बालकांना आरोग्य विभागामार्फत पल्स पोलिओची लस देणार आहोत, त्याकरिता २१२ बुथची व्यवस्था केली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, समाज मंदिर, सार्वजनिक ठिकाणी अशा सर्व ठिकाणी बुथची व्यवस्था केली आहे. वाळवा तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील यांनी आभार मानले.
फोटो - ३१०१२०२१-आयएसएलएम-कासेगाव पोलिओ न्यूज
वाळवा तालुक्याचे पल्स पोलिओ लसीकरण देवराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी शुभांगीताई पाटील, संगीताताई पाटील, डॉ. राम हंकारे, किरण पाटील उपस्थित होते.