उमदीत युवक राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:04+5:302021-08-27T04:29:04+5:30

उमदी : उमदीतील कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवा. युवकांचे संघटन करून मोठी फळी निर्माण करा. तसेच अन्यायाविरोधात सतत आवाज ...

Inauguration of Umadit Youth Nationalist Office | उमदीत युवक राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन

उमदीत युवक राष्ट्रवादी कार्यालयाचे उद्घाटन

उमदी : उमदीतील कार्यालयाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवा. युवकांचे संघटन करून मोठी फळी निर्माण करा. तसेच अन्यायाविरोधात सतत आवाज उठवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

उमदी (ता. जत) येथील युवक राष्ट्रवादी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, तालुका अध्यक्ष रमेश पाटील प्रमुख म्हणून उपस्थित होते.

उमदी येथे बसस्थानक परिसरात पुजारी काॅम्प्लेक्स येथे युवक तालुका उपाध्यक्ष फिरोजभाई मुल्ला यांनी युवक राष्ट्रवादी कार्यालयाची सुरुवात केली. या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवणार असल्याचे मत तालुका फिरोजभाई मुल्ला यांनी सांगितले.

यावेळी ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर, माजी उपसरपंच निसारभाई मुल्ला, उत्तम कट्टमणी, राजू मकानदार, रवी शिवपुरे, बसवराज पाटील, दावल पलुजकर आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Umadit Youth Nationalist Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.