चिंचोलीत सामाजिक सभागृहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:49 IST2021-03-13T04:49:41+5:302021-03-13T04:49:41+5:30
कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथे बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात ...

चिंचोलीत सामाजिक सभागृहाचे उद्घाटन
कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथे बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे उद्घाटन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी शिवाजीराव नाईक यांनी सुचवलेल्या डोंगरी विकास निधीमधून ९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चिंचोली सरपंच फत्तेसिंग पाटील, तानाजी घोडे, उपसरपंच सुरेश जाधव, भटवाडी सरपंच विजय महाडिक, भगवान मस्के, सुनील घोलप, अजित घोलप, अशोक घोलप, ज्ञानदेव जाधव, शिवाजी जाधव, संतोष घोलप, आनंदा बानकर, रूपेश घोलप, संदीप घोलप, रंजना घोलप, रूपाली घोलप, तानाजी जाधव, ठेकेदार नीलेश पाटील आदी उपस्थित होते. सुनील घोलप यांनी आभार मानले.