पडवळवाडीच्या पेयजल कामाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:22+5:302021-07-17T04:21:22+5:30
वाळवा: मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या पाणी पुरवठा योजनेमुळे माय माऊलींच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे, असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी ...

पडवळवाडीच्या पेयजल कामाचे उद्घाटन
वाळवा: मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या पाणी पुरवठा योजनेमुळे माय माऊलींच्या डोक्यावरील हंडा उतरला आहे, असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.
वाळवा तालुक्यातील पडवळवाडी येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत पूर्ण केलेल्या कामाचे उद्घाटन आमदार खोत यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. या योजनेसाठी ६६ लाख रूपये खर्च करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्या डॉ. सुषमा नायकवडी, युवा नेते व हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, पडवळवाडी सरपंच प्रमिला यादव, उपसरपंच अतुल कोकाटे, लालासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य मारूती यादव, ग्रामसेविका शीला थिटे, मानाजी सापकर, शशिकांत शेळके, अतुल पाटील, किरण उथळे, संजय पवार, बजरंग भोसले उपस्थित होते.