आष्ट्यात ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:18 IST2021-06-19T04:18:29+5:302021-06-19T04:18:29+5:30

आष्टा : माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टा येथील दत्त वसाहतीत नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या ...

Inauguration of Oxygen Park in Ashta | आष्ट्यात ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन

आष्ट्यात ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन

आष्टा : माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टा येथील दत्त वसाहतीत नगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन नगराध्यक्ष स्नेहा माळी व आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांच्या हस्ते झाले. वैभव शिंदे, स्नेहा माळी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वैभव शिंदे म्हणाले, दत्त वसाहत येथे ऑक्सिजन पार्क निर्माण करण्यासाठी पालिका सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. येथे ऑक्सिजन देणारी विविध प्रकारची झाडे लावण्यात येणार आहेत. पालिकेच्या वतीने शहरात प्रथमच असा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. नागरिकांनी ऑक्सिजन पार्कचे संगोपन करावे. यावेळी माजी नगराध्यक्ष झुंजारराव पाटील, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, पक्षप्रतोद विशाल शिंदे, जायंट्सचे अध्यक्ष समीर गायकवाड, धैर्यशील शिंदे, बाबासाहेब सिद्ध, संगीता सूर्यवंशी, तेजश्री बोंडे, अनिल बोंडे, मनीषा जाधव, प्रभाकर जाधव, अर्जुन माने, प्रकाश रूकडे, डॉ. प्रकाश आडमुठे, उपस्थित होते.

फोटो : १८ आष्टा १

ओळ : आष्टा येथील दत्त वसाहत येथे ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन वैभव शिंदे, स्नेहा माळी, झुंजारराव पाटील, विशाल शिंदे, प्रतिभा पेटारे, डॉ. कैलास चव्‍हाण, समीर गायकवाड यांच्याहस्ते झाले.

Web Title: Inauguration of Oxygen Park in Ashta