चिंचणी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:28 IST2021-08-15T04:28:14+5:302021-08-15T04:28:14+5:30
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. प्रकल्प उभारणी ...

चिंचणी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन
कडेगाव : चिंचणी (ता. कडेगाव) येथील ग्रामीण रुग्णालयात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. प्रकल्प उभारणी केलेल्या लुथ्रा ग्रुपकडून हस्तांतरण करण्यात आले. हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पाची एकाचवेळी ५० बेडला ऑक्सिजन पुरवठा करण्याची क्षमता आहे. आता रुग्णालयात बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
राज्य शासन आणि सुरत, गुजरात येथील लुथ्रा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. आ. मोहनराव कदम यांच्याहस्ते ग्रामीण रुग्णालयाकडे हस्तांतरण करून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. यावेळी कडेगावचे प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, माजी सभापती मंदाताई करांडे, पंकज आम्ले, संदीप देसाई, राजेश मेहता उपस्थित होते.
चिंचणी येथील ग्रामीण रुग्णालयात सध्या ३० बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू आहे. या रुग्णालयात आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती येथेच व्हावी, यादृष्टीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पातून १६७ एलपीएम (प्रति मिनीट) ऑक्सिजन निर्मिती होणार आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अधिक पाटील, डॉ. आशिष कालेकर, डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, डॉ. मिलिंद मदने, डॉ. सुधीर डुबल, चिंचणीच्या सरपंच सौ. मनीषा माने, उपसरपंच दीपक महाडिक, नंदकुमार माने, आनंदराव पाटील, श्रीपती माने आदी उपस्थित होते.