करगणीत मिनी काेविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:39+5:302021-05-13T04:27:39+5:30
करगणी : कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची सोय व्हावी यासाठी करगणी (ता. आटपाडी) येथे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व ...

करगणीत मिनी काेविड सेंटरचे उद्घाटन
करगणी : कोरोना संसर्ग वाढत असल्याने रुग्णांची सोय व्हावी यासाठी करगणी (ता. आटपाडी) येथे ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व लोकसहभागातून सुसज्ज असे ५० बेडचे मिनी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये पाच ऑक्सिजनचे बेड आहेत. शिवसेनेचे नेते तानाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनिल बाबर यांच्या हस्ते कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी तानाजीराव पाटील, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार सचिन मुळीक, गट विकास अधिकारी पंकज शेळके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साधना पवार, ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पत्की, रासपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर उपस्थित होते.
सध्या करगणी परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यासाठी आटपाडी एज्युकेशन सोसायटीच्या श्री राम हायस्कूलमध्ये मिनी कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला. सरपंच गणेश खंदारे, माजी सरपंच विजयसिंह सरगर, दत्तात्रय पाटील, तुकाराम जानकर, माजी अध्यक्ष पांडुरंग सरगर, अभयसिंह पोकळे, रमेश माने, पप्पू पाटील यांच्यासह तानाजीराव पाटील युवा मंचच्या सदस्यांनी लोकसहभागातून मिनी कोविड केअर सेंटर उभारले. वैधकीय अधिकारी डॉ. प्रशांत चवरे, डॉ. गावडे व कर्मचारी आणि आशा सेविका यांच्या माध्यमातून येथे उपचार केले जाणार आहेत.