लायन्स क्लब ऑफ सांगली सिटीचा पदग्रहण साेहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:21 IST2021-07-17T04:21:40+5:302021-07-17T04:21:40+5:30
सांगली : सांगलीतील लायन्स क्लब ऑफ सांगली सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण साेहळा उत्साहात पार पडला. स्मिता चंद्रशेखर बजाज यांची ...

लायन्स क्लब ऑफ सांगली सिटीचा पदग्रहण साेहळा उत्साहात
सांगली : सांगलीतील लायन्स क्लब ऑफ सांगली सिटीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण साेहळा उत्साहात पार पडला. स्मिता चंद्रशेखर बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
प्रमुख पाहुणे माजी जिल्हा गव्हर्नर विजय राठी यांच्या हस्ते नूतन सदस्यांना पद व गाेपनीयतेची शपथ देण्यात आली. यावेळी स्मिता बजाज म्हणाल्या, सध्या काेराेनाचा प्रसार माेठ्या प्रमाणात वाढत आहे. सर्वच स्तरातील लाेकांना याची झळ पाेहाेचली आहे. भविष्यात लहान मुलांना धाेका असल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून जनजागृती, मदत व अन्य उपक्रम राबविणार आहे.
नूतन कार्यकारिणीमध्ये ज्याेती सारडा (सचिव), अर्चना निलावर (खजिनदार), साधना बगडिया, नूतन शहा, सुखदा गाडगीळ, रश्मी मालाणी, श्वेता मुंदडा यांचा समावेश आहे. यावेळी आय हॉस्पिटल कमिटीसाठी श्रीकांत भाेकरे यांची निवड करण्यात आली. काेविडच्या नियमांचे पालन करून माेजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.