तासगावमध्ये कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:17+5:302021-04-30T04:35:17+5:30
तासगाव : आमदार सुमनताई पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तासगाव येथे सुरू केलेल्या ऑक्सिजनसह २६ बेडच्या कोविड सेंटरचे बुधवारी उद्घाटन ...

तासगावमध्ये कोविड सेंटरचे उद्घाटन
तासगाव : आमदार सुमनताई पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तासगाव येथे सुरू केलेल्या ऑक्सिजनसह २६ बेडच्या कोविड सेंटरचे बुधवारी उद्घाटन करून लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे तासगांव ग्रामीण रुग्णालय येथे आता कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनसह ५६ बेडची सोय झाली आहे.
यावेळी या सेंटरसाठी सर्व ती मदत करू, अशी ग्वाही रोहित पाटील यांनी दिली. येथे सर्व उपचार शासनाच्या वतीने मोफत होणार असल्याचे तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले.
तासगावातील ग्रामीण रुग्णालयनजीक असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आमदार सुमनताई पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विस्तारित कोविड सेंटर मागील वर्षी सुरू करण्यात आले होते. तासगाव शहरासह तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने पुन्हा हे सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी रोहित पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे केली होती.
बुधवारी तहसीलदार कल्पना ढवळे यांच्या हस्ते कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील, पोलीस निरीक्षक संजीव झाडे आदी उपस्थित होते.
चाैकट
विनामोबदला सेवा
या कोविड सेंटरसाठी डॉ. विजय जाधव तसेच डॉ. सचिन पाटील, डॉ. विवेकसागर पाटील, डॉ. दीपिका पाटील, डॉ. हर्षद माळी याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ७० डॉक्टरांचे पथक विनामोबदला रुग्णांची २४ तास सेवा करणार आहेत. या विनामोबदला स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे तहसीलदार कल्पना ढवळे यांनी अभिनंदन केले.