कासेगावमध्ये कोविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:06+5:302021-05-09T04:27:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे ग्रामीण भागातील पहिले कोविड सेंटर येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये सुरू झाले ...

कासेगावमध्ये कोविड सेंटरचे उद्घाटन
लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : कासेगाव (ता. वाळवा) येथे ग्रामीण भागातील पहिले कोविड सेंटर येथील मातोश्री हॉस्पिटलमध्ये सुरू झाले आहे. यामध्ये पाच आयसीयू बेड व १५ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. या कोविड रुग्णालयाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या संगीता पाटील, लिंबाजी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश मत्ते, सरपंच किरण पाटील, डॉ. तुळशीदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकसंख्येच्या मानाने कोरोना सेंटर होणे गरजेचे होते.
वाळवा तालुक्यातील कासेगाव हे मोठी बाजारपेठ आहे. परिसरात ३५ हून अधिक गावे आहेत. अशा वर्दळीच्या गावात नेर्ले गावचे डॉ. तुळशीदास पाटील व डॉ. सरलाराणी पाटील हे दाम्पत्य रुग्णसेवा करत आहेत. मागील वर्षी कोरोनाच्या काळात डॉ. तुळशीदास पाटील यांनी अनेक कोरोना रुग्णांना बरे केले. यंदाही कोरोना रुग्णांची संख्या पाहता आपल्या इथेही कोरोनाग्रस्तांची सेवा व्हावी यासाठी शासकीय दरात कोविड सेंटर सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कोरोनाग्रस्तांची सोय झाली आहे.
यावेळी डॉ. साईराज पाटील, डॉ अरुण शिंदे, डॉ. सर्वजित पाटील, डॉ. अजिंक्य कुलकर्णी, डॉ. दीक्षिता मोहन, डॉ. शिवलिंग राजमाने, सुहेल तांबोळी आदी उपस्थित होते.