फोटो
कडेगाव : कडेगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी खेचून आणणार आहे. विकासकामांनी शहराचा चेहरामोहरा बदलू, असे प्रतिपादन सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
कडेगाव शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व ‘आय लव्ह कडेगाव’ या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन विश्वजित कदम यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, युवा नेते डॉ. जितेश कदम, ज्येष्ठ नेते सुरेश थोरात, सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले, नगराध्यक्षा संगीता जाधव, उपनगराध्यक्ष सागर सूर्यवंशी, मुख्याधिकारी कपिल जगताप उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले, नगरपंचायतीने कोरोना काळात अतिशय उत्तम काम केले आहे. जास्तीत जास्त लसीकरण योग्य पद्धतीने व्हावे, याचे योग्य नियोजन केले आहे.
यावेळी सुरेश देशमुख, नगरसेवक साजिद पाटील, राजू जाधव, दिनकर जाधव आदी उपस्थित होते.