जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाचे १३ रोजी उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:33 IST2021-09-10T04:33:11+5:302021-09-10T04:33:11+5:30
सांगली : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मानदंड ठरेल अशा सर्व अत्याधुनिक सेवासुविधांनीयुक्त सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्लामपूर विभागीय ...

जिल्हा बँकेच्या विभागीय कार्यालयाचे १३ रोजी उद्घाटन
सांगली : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मानदंड ठरेल अशा सर्व अत्याधुनिक सेवासुविधांनीयुक्त सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इस्लामपूर विभागीय कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन सोमवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील हे आहेत.
दिलीपतात्या पाटील यांनी जिल्हा बँकेची सूत्रे हाती घेतल्यापासून बँकेच्या कामकाजात आधुनिकता आणण्याचा, खासगी बँकांच्या तोडीस तोड कार्पोरेट लूक देण्याचे काम करीत आहेत. जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयातही सर्व सुविधांंनी युक्त व प्रशस्त बदल करण्यात आला. त्यानंतर अनेक शाखांचेही नूतनीकरण करण्यात आले. अद्याप काही शाखांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
बँकेच्या वतीने इस्लामपूर येथे विभागीय कार्यालयासाठी सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. या ठिकाणी वाळवा, शिराळा व पलूस तालुक्यांसाठी विभागीय कार्यालयांचे कामकाज चालणार आहे. नव्या इमारतीत आधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सुसज्ज कॉन्फन्स हॉल तसेच नाबार्डच्या बैठका, चर्चासत्रे, सहकारसंबंधी विविध बैठका, मेळावे, बचत गटांच्या बैठका, मार्गदर्शन शिबिरे आदी कार्यक्रमांसाठी उपयोगी असे सभागृह तयार करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन सोमवारी होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील यांनी केले आहे.