निंबवडे, राजेवाडी, लिंगीवरेत विकासकामांचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:07+5:302021-09-15T04:31:07+5:30
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे, लिंगीवरे, राजेवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झाला. या ...

निंबवडे, राजेवाडी, लिंगीवरेत विकासकामांचा शुभारंभ
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील निंबवडे, लिंगीवरे, राजेवाडी येथे विविध विकासकामांचा शुभारंभ भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झाला.
या वेळी माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सभापती पुष्पा सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे, माजी उपसभापती तानाजी यमगर, माजी उपसभापती रुपेश पाटील, विष्णुपंत अर्जुन, भाजप तालुकाध्यक्ष उमाजी सरगर आदी उपस्थित होते. निंबवडे येथील मॉडेल स्कूल अंतर्गत जि. प. शाळा नंबर १ व शाळा नंबर २ येथे नूतन इमारत बांधकामाचे भूमिपूजन केले.
लिंगीवरे येथे गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक विकासनिधीतून व विशेष प्रयत्नांतून सभामंडप, हायमास्ट पोल व पाण्याची टाकी आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
राजेवाडीतील सभामंडपाचे भूमिपूजन गोपीचंद पडळकर याचे हस्ते करण्यात आले. या वेळी अनिल सूर्यवंशी, शेखर रणदिवे, अजित पुजारी, आबासाहेब भानवसे, सरपंच पांडुरंग कोडलकर, उपसरपंच सुरेश शिरकांडे, तानाजी जरग, बंडू खांडेकर, दादा जरग, भिवा सातपुते, कालिदास पुजारी, संजय चांगण, श्रीकांत कुंभार, सिद्धेश्वर शिरकांडे, विलास साबळे, वैभव कोडलकर, वैभव हेगडे आदी उपस्थित होते.
140921\img-20210913-wa0114.jpg
निंबवडे पंचायत समिती गणात विविध विकास कामाचे उद्घाटन करताना आमदार गोपीचंद पडळकर,माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, सभापती पुष्पा सरगर यासह अन्य मान्यवर