अंकलखोप येथे विकासकामांचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:38 IST2021-02-26T04:38:46+5:302021-02-26T04:38:46+5:30

फोटो ओळी : अंकलखोप (ता. पलूस) येथे कार्यक्रमावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा शक्तिकुमार पाटील, माणिकराव सूर्यवंशी यांनी ...

Inauguration of development works at Ankalkhop | अंकलखोप येथे विकासकामांचे उद्घाटन

अंकलखोप येथे विकासकामांचे उद्घाटन

फोटो ओळी : अंकलखोप (ता. पलूस) येथे कार्यक्रमावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचा शक्तिकुमार पाटील, माणिकराव सूर्यवंशी यांनी सत्कार केला.

अंकलखोप सहकारी पीक संरक्षण संस्थेच्या नवीन इमारत, अंकलखोप येथील जनसंपर्क कार्यालय, अंकलखोप विकास सोसायटीच्या नूतनीकरण कार्यालयाचे उद्घाटन, दाजी गुरुजी व्यायामशाळा इमारत, सिद्धेश्वर मंदिर सभामंडप बांधकामाचा उद्घाटन सोहळा पार पडला.

यावेळी सरपंच अनिल विभूते, उपसरपंच विनय पाटील, अंकलखोप विकास सोसायटीचे अध्यक्ष शक्तिकुमार पाटील,

बाजीराव आप्पा पाटील बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जे. के. पाटील, घन:श्याम सूर्यवंशी, उदय पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, अजित शिरगावकर, शामराव पाटील, हणमंत पाटील, एम. के. चौगुले, अशोक हजारे, गजाभाऊ सूर्यवंशी, अजित शिरगावकर, श्वेता बिरनाळे, आदी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of development works at Ankalkhop