नागाव येथे संरक्षण भिंतीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:44+5:302021-07-01T04:18:44+5:30
बागणी : नागाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे ...

नागाव येथे संरक्षण भिंतीचे उद्घाटन
बागणी : नागाव (ता. वाळवा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते करण्यात आले.
प्राजक्ता कोरे यांच्या विशेष निधीतून हे काम केले जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण सभापती आशाताई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. कोरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधत गावातील कोरोना रुग्णांची संख्या व त्याबाबत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. त्याचबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या कामाची दखल घेत ग्रामसेविका शुभांगी भारती यांचा सत्कार केला.
यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब पाटील, डॉ. राजेंद्र पाटील, चेतन मगर, उपसरपंच संभाजी भोळे, विनोद पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत मगर, श्रीकांत मगर, सर्जेराव पाटील, शिवाजी पाटील, सुधीर मगर, आर. जे. पाटील आदी उपस्थित होते.