क्रेझी आइस्क्रीमच्या ‘कुल अँड बेक’ या ब्रँडशॉपीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:24 IST2021-02-07T04:24:08+5:302021-02-07T04:24:08+5:30
(टीप : ही बातमी दाेन कॉलम ९ सेंमी वापरावी, असा जाहिरात विभागाचा निराेप आहे.) सांगली : येथील क्रेझी आइस्क्रीमच्या ...

क्रेझी आइस्क्रीमच्या ‘कुल अँड बेक’ या ब्रँडशॉपीचे उद्घाटन
(टीप : ही बातमी दाेन कॉलम ९ सेंमी वापरावी, असा जाहिरात विभागाचा निराेप आहे.)
सांगली : येथील क्रेझी आइस्क्रीमच्या ‘कूल अँड बेक’ या शॉपीचे उद्घाटन चितळे दूधचे संचालक गिरीश चितळे यांच्या हस्ते झाले. यावेळी वसंतदादा औद्याेगिक वसाहतीचे अध्यक्ष सचिन पाटील, उमेद ग्रुपचे संचालक सतीश मालू, रंगराव इरळे, श्री जैन, विजय भगत, उज्ज्वल साठे, क्रेझी आइस्क्रीमचे संचालक संताजी कदम, महेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
क्रेझी आइस्क्रीमने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, इत्यादी ठिकाणी आपला विस्तार केला आहेच. आता या ‘कुल अँड बेक’ या फ्रॅन्चाईजीच्या माध्यमातून त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. या शॉपीमध्ये प्रीमियम आइस्क्रीमबरोबरच दुग्धजन्य पदार्थ, मिल्क शेक, फालुदा, मस्तानी, आइसकेक, पिझ्झा, बर्गर, ब्रँडेड बेकरी प्रॉडक्टस अँड स्नॅक्स, इत्यादी सर्व प्रॉडक्ट एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
या ठिकाणी रेप्युटेड ब्रँड आणि गुडविल असलेल्या कंपनीसोबत बिझनेस करण्याची संधी नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. व्यवसाय वाढीसाठी लागणारा सर्व सपोर्ट कंपनीकडून मिळणार असून केलेल्या इन्व्हेस्टमेंटवर चांगले रिटर्न व चांगले मार्जिन देण्याचा प्रयत्न करणार आहे, असा मानस क्रेझीचे मार्केटिंग मॅनेजर प्रशांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, ग्राहक, टीएलसी ग्रुप सांगली, रोटरी क्लब ऑफ सांगली मिडटाउन आणि क्रेझी टीममधील सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फाेटाे : ०६ ग्राम १