शिराळा येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:27 IST2021-04-01T04:27:04+5:302021-04-01T04:27:04+5:30
शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीमधील अंतर्गत काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा ...

शिराळा येथे काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन
शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीमधील अंतर्गत काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : प्रत्येक नागरिकाला रस्ते, वीज, पाणी व स्वच्छता या सुविधा चांगल्याप्रकारे मिळायलाच हव्यात , असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील प्राध्यापक कॉलनीमधील सुमारे दहा लाख रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या अंतर्गत काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ‘विश्वास’चे संचालक विश्वास कदम प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी उपनगराध्यक्ष विजय दळवी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. आ. नाईक यांच्या हस्ते फीत कापून रस्त्याचे उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्ष सुनीता निकम, सभापती प्रतिभा पवार, अर्चना शेटे, कीर्तीकुमार पाटील, संजय हिरवडेकर, पृथ्वीसिंग नाईक, गजानन सोनटक्के, सुनील कवठेकर, बजरंग कुरणे, राजेंद्र निकम, डी. एन. मिरजकर, आर. बी. शिंदे, दिलीप घाटगे, सुधीर यादव, प्रताप यादव, राजसिंह पाटील, जनार्दन कुरणे, संपत कुरणे, दीपक कुरणे, गणपत कुरणे, रफिक अत्तार उपस्थित होते.