माडग्याळमध्ये काेविड सेंटरचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST2021-05-08T04:26:28+5:302021-05-08T04:26:28+5:30
शेगाव : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालयात ४० ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार ...

माडग्याळमध्ये काेविड सेंटरचे उद्घाटन
शेगाव : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालयात ४० ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, संखचे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे, उपसभापती विष्णू चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, सरपंच इरान्ना जत्ती, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, अधीक्षक सतीश गडदे, वैद्यकीय अधिकारी प्रियांका पाटील, प्रदीप करगणीकर उपस्थित होते.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत म्हणाले, सद्य:स्थितीत देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. ग्रामीण भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांवर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. याचा विचार करून पालकमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अत्यंत चांगले नियोजन करण्यात येत आहे. तरीही नागरिकांनी मास्क वापरणे, हात वेळोवेळी स्वच्छ करणे,सामाजिक अंतर ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे नियम पाळावेत. येणाऱ्या काळात कोरोना संक्रमण घटेल, अशी अपेक्षा आहे. तरी सर्व तालुक्यातील नागरिकांनी घरी राहून स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. माडग्याळ येथे ऑक्सिजन बेड व कोविड सेंटर सुरू झाल्याने या भागातील कोविड रुग्णांची साेय होणार आहे.