केदारवाडी येथील बळीची पाणंद रस्त्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:27 IST2021-03-27T04:27:36+5:302021-03-27T04:27:36+5:30

केदारवाडी (ता. वाळवा) येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटन आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर थोरात, चंद्रशेखर थोरात ...

Inauguration of Bachi Panand Road at Kedarwadi | केदारवाडी येथील बळीची पाणंद रस्त्याचे उद्घाटन

केदारवाडी येथील बळीची पाणंद रस्त्याचे उद्घाटन

केदारवाडी (ता. वाळवा) येथे पाणंद रस्त्याचे उद्घाटन आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अमर थोरात, चंद्रशेखर थोरात उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

नेर्ले : केदारवाडी (ता. वाळवा) येथे दहा लाख रुपये खर्चून पूर्ण झालेल्या बळीची पाणंद रस्त्याचे उद्घाटन आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाले. या रस्त्याचा अनेक शेतकऱ्यांना, नागरिकांना फायदा होणार आहे. सार्वजनिक हिताच्या कामासाठी माझे प्राधान्य राहिले आहे, असे मत आमदार नाईक यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच अमर थोरात, उपसरपंच सुलोचना चव्हाण, माजी सरपंच चंद्रशेखर थोरात, विशाल माने, राजारामबापू दूध संघाचे माजी संचालक हिंदुराव माने, प्रशांत, अशोक व विशाल माने, जयराम गुरव, बाजीराव देसाई मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Bachi Panand Road at Kedarwadi