अंकलखोपमध्ये औदुंबर क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:47+5:302021-08-24T04:30:47+5:30
अंकलखोप : कोरोना महामारी व महापुराच्या संकट काळात सर्वत्र आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक उद्योग व व्यवसाय आर्थिक ...

अंकलखोपमध्ये औदुंबर क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन
अंकलखोप : कोरोना महामारी व महापुराच्या संकट काळात सर्वत्र आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक उद्योग व व्यवसाय आर्थिक अडचणीत आले आहेत. आर्थिक स्राेत बंद झाल्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. अशा व्यवसायांना अंकलखोप येथे नव्याने सुरू झालेली औदुंबर क्रेडिट सोसायटी नवसंजीवनी ठरणार आहे, असे प्रतिपादन उद्योजक सर्जेराव यादव यांनी व्यक्त केले.
अंकलखोप (ता. पलूस) येथे औदुंबर क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन सोना उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव यादव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यादव म्हणाले, ग्रामीण भागातील व्यवसाय मोठे करण्यास ही संस्था कायम पुढे राहील. यावेळी संस्थापक अमोल सूर्यवंशी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, गावातील सर्व मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुदीप गडदे यांनी स्वागत केले. विशाल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. दिनार पाटील यांनी आभार मानले.
फोटो : २३ अंकलखाेप १
ओळ : अंकलखोप (ता. पलूस) येथे औदुंबर क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन सोना उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी सर्व संचालक उपस्थित हाेते.