आटपाडीत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST2020-12-12T04:42:56+5:302020-12-12T04:42:56+5:30

सभापती भाऊसाहेब गायकवाड म्हणाले, खरेदी केंद्रात बाजार समितीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका आधारभूत धान्य ...

Inauguration of Atpadi Maize Shopping Center | आटपाडीत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

आटपाडीत मका खरेदी केंद्राचे उद्घाटन

सभापती भाऊसाहेब गायकवाड म्हणाले, खरेदी केंद्रात बाजार समितीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी मका आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा लाभ घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी मका नोंद असलेला चालू वर्षाचा सात-बारा उतारा, आठ ‘अ’ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेराॅक्स ही कागदपत्रे घेऊन बाजार समितीमध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावे, त्यानंतर आपला माल खरेदी केला जाईल.

यावेळी तहसीलदार सचिन लंगुटे, उपसभापती दिलीप खिलारी, पंचायत समितीचे उपसभापती रूपेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सिध्देश्वर मेनकुदळे, पंढरीनाथ नागणे, अजयकुमार भिंगे, दादासाहेब पाटील, शहाजी पाटील, वसंत अर्जुन, आर. के. देशमुख, सचिव एस. यु. जाधव उपस्थित होते.

फोटो-11atapadi01

फोटो ओळ : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्याहस्ते आधारभूत मका धान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

Web Title: Inauguration of Atpadi Maize Shopping Center