वाळवा येथे अरुणभैय्या हेल्थ क्लबचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:34+5:302021-01-13T05:07:34+5:30
वाळवा : येथील हुतात्मा किसन अहिर स्मारकस्थळी अद्ययावत व्यायाम मशिनरीचे अरुणभैय्या हेल्थ क्लब उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन नामदेवराव मोहिते ...

वाळवा येथे अरुणभैय्या हेल्थ क्लबचे उद्घाटन
वाळवा : येथील हुतात्मा किसन अहिर स्मारकस्थळी अद्ययावत व्यायाम मशिनरीचे अरुणभैय्या हेल्थ क्लब उभारण्यात आले. त्याचे उद्घाटन नामदेवराव मोहिते यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी, जिल्हा क्रीडा प्रशिक्षक प्रशांत पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष पै. नंदू पाटील, उपसरपंच पोपट अहिर प्रमुख उपस्थित होते.
वाळवा ग्रामपंचायतीने वारंवार केलेल्या मागणीमुळे जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा नियोजन समिती फंडातून ७.५ लाख रुपयांचा निधी या हेल्थ क्लबमधील आधुनिक व्यायाम मशिनरीकरिता मिळाला आहे. याचे अधिकृत उद्घाटन होऊन हे क्लब सर्वांना व्यायामासाठी लोकार्पण करण्यात आले. यावेळी गौरव नायकवडी यांनी सर्वांचे स्वागत केले. उमेश घोरपडे यांनी आभार मानले.
यावेळी इस्लामपूर विधानसभा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू वलांडकर, ग्रामपंचायत सदस्य इसाक वलांडकर, संदेश कांबळे, मानाजी सापकर, प्रमोद यादव, हुतात्मा दूध संघाचे संचालक संजय होरे, शरद पवार, कुस्ती पंच हणमंत जाधव, रूद्र नायकवडी, आदी उपस्थित होते.
फोटो-११वाळवा१
फोटो ओळ : वाळवा येथे अरुणभैय्या हेल्थ क्लबचे उद्घाटन नामदेवराव मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भीमराव माने, गौरव नायकवडी, प्रशांत पवार, नंदू पाटील, पोपट अहिर उपस्थित होते.