शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट नाका, वाहनांची तपासणी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 13:31 IST

सुशांत घोरपडे म्हैसाळ : लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर म्हैसाळ जवळ चेकपोस्ट उभा केला आहे. याठिकाणी वाहनांची ...

सुशांत घोरपडेम्हैसाळ : लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर म्हैसाळ जवळ चेकपोस्ट उभा केला आहे. याठिकाणी वाहनांची काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे.सद्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू शकते. याअनुशंगाने आंतरराज्य तसेच आंतरजिल्ह्यातील सीमा चौक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक मजबुती देण्याचा निर्णय काल, मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला होता. दरम्यानच, मिरज ग्रामीण पोलिसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभा केले असून या पथकात दोन पोलीस अधिकारी, तीन पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांचा समावेश करण्यात आला आहे.निवडणुकीच्या कालावधीत वाहनातून बनावट दारु, गुटखा, अवैध धंदे यांची वाहतूक होण्याची शक्यता आहे. याला आळा बसावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी वाहनांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभा केले आहे. याद्वारे वाहनांची तपासणी, बनावट दारू,गुटखा यांची तस्करी होणार नाही. यादृष्टीने पोलीस काटेकोरपणे तपासणी करत आहेत. - भैरव तळेकर, पोलीस निरीक्षक-मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन

टॅग्स :Sangliसांगलीlok sabhaलोकसभाPoliceपोलिस