शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
3
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
4
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
7
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
8
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
9
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
10
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
11
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
12
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
13
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
14
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
15
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
16
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
17
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
18
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
19
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
20
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...

Gram Panchayat Election Result: खानापूर तालुक्यात आजी-माजी आमदारांचा सामना बरोबरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 15:36 IST

राजधानी भेंडवडेत आमदार बाबर गटाला धक्का 

दिलीप मोहिते विटा : खानापूर तालुक्यात झालेल्या चार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्या गटाला दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त गटाला दोन ग्रामपंचायत मिळाले. राजधानी भेंडवडीत शिवसेना आमदार बाबर गटाला धक्का बसला असून येथे विरोधी गटाने सत्तांतर घडवून आणले आहेत. या चार ग्रामपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीचा सामना आजी-माजी आमदारांच्यात बरोबरीत सुटला आहे.खानापूर तालुक्यातील साळशिंगे, राजधानी भेंडवडे, देवनगर व गावठाण भेंडवडे या चार ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सोमवारी विटा येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत मतमोजणी झाली.या निवडणुकीत विद्यमान आ. अनिल बाबर गटाला देवनगर व गावठाण भेंडवडे येथे सत्ता मिळाली असून गावठाण भेंडवडे येथे राष्ट्रवादीचे युवा नेते राजू जानकर यांना धक्का देत विद्यमान आमदार बाबर गटाने सत्ता काबीज केली आहे.तसेच माजी आमदार सदाशिवराव पाटील व भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संयुक्त गटाने राजधानी भेंडवडे येथे सत्तांतर घडवून आणले असून आ. बाबर यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. याच गटाने साळशिंगे ग्रामपंचायतीची सत्ता कायम ठेवली आहे. या गटाच्या सरपंच पदाच्या उमेदवार छाया भीमराव पवार या केवळ पाच मतांनी विजयी झाल्या आहेत.

खानापूर तालुका ग्रामपंचायत निकाल :- 

देवनगर - शिवसेना सत्ता कायम.विशाल सुभाष पवार - सरपंच सर्व ७ सदस्य बिनविरोध. (आ. अनिल बाबर गट शिवसेना सत्ता )

राजधानी भेंडवडे - सत्तांतर शिवसेना आ. अनिल बाबर गटाला धक्का. स्नेहल विशाल पाटील - सरपंच (आ. गोपीचंद पडळकर व माजी आमदार सदाशिवराव पाटील गटाची सत्ता)

गावठाण भेंडवडे - सत्तांतरराष्ट्रवादीचे राजू जानकर यांना धक्का.तिरंगी लढत वैभव जानकर - सरपंच (शिवसेना आ. अनिल बाबर गटाची सत्ता) 

साळशिंगे - सत्ता कायममाजी आ. सदाशिवराव पाटील व आ. पडळकर गटाची सत्ता.छाया भीमराव पवार - सरपंच सरपंच पदावर विराजमान झालेल्या श्रीमती छाया पवार या पाच मतांनी विजयी झाल्या आहेत.याच ग्रामपंचायतच्या प्रभाग ३ मधील सदस्य पदाच्या दोन उमेदवाराना समान २९१ मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून निकाल जाहीर करण्यात आला. यात माजी आ. सदाशिवराव पाटील गटाच्या ज्योती संतोष यादव विजयी झाल्या.निवडणुकीचा निकाल - आ. अनिल बाबर शिवसेना - २ देवनगर, गावठाण भेंडवडे.माजी आ. सदाशिवराव पाटील व आ. गोपीचंद पडळकर गट - २ साळशिंगे, राजधानी भेंडवडे.

टॅग्स :Sangliसांगलीgram panchayatग्राम पंचायतResult Dayपरिणाम दिवस