शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वीजनिर्मितीच्या नावाखाली कोयनेत अतिरिक्त पाणीसाठ्याचा अट्टाहास नको, अन्यथा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 14:28 IST

पश्चिम महाराष्ट्रातील महापुरांविषयी स्वतंत्र महापूर प्राधीकरण स्थापन करावे

सांगली : धरणांतील पाणीसाठ्यांविषयी केंद्रीय जल आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही, तर प्रसंगी न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने दिला आहे. वीजनिर्मितीच्या अट्टाहासापोटी कोयना धरणात अतिरिक्त पाणी साठविण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवालही समितीने केला आहे.समितीचे सदस्य विजयकुमार दिवाण, हणमंत पवार, प्रभाकर केंगार, संजय मोरे, प्रदीप वायचळ यांनी पत्रकार बैठकीत माहिती दिली. ते म्हणाले, धरणातील पाणीसाठ्याच्या व्यवस्थापनाचे नियम शासनाकडून पाळले जात नाहीत. ३१ मे रोजी सर्व धरणांत क्षमतेच्या १० टक्केच पाणीसाठा असावा अशी जल आयोगाची सूचना आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन अतिरिक्त पाणीसाठा केला जातो.त्यामुळे सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्हे महापुरात लोटले जातात. २०१९ च्या महापुरात यामुळे ५५ हजार कोटींचे नुकसान झाल्याचे शासनाचाच अहवाल सांगतो. त्यामुळे पाणीसाठ्याविषयी कडक धोरणाची गरज आहे. ३१ मे रोजी १० टक्क्यांपेक्षा जादा पाणीसाठा ठेवल्यास प्रसंगी जनहीत याचिकेद्वारे कायदेशीर दाद मागू.पश्चिम महाराष्ट्रातील महापुरांविषयी स्वतंत्र महापूर प्राधीकरण स्थापन करावे. त्यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून अभ्यासू व्यक्तींचा समावेश करावा. सर्व धरणांतील पाणीसाठ्याचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने व्हावे. वीजनिर्मितीसाठी पाणी साठवून ठेवण्याचा अट्टाहास धरु नये.संपूर्ण सांगली जिल्ह्याला सिंचन, असिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी ३७.५० टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यापेक्षा कितीतरी अधिक पाणी जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. या स्थितीत धरणांत अवास्तव पाणीसाठा करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे.कोयनेची वीज म्हणजे सर्वस्व नव्हेदिवाण म्हणाले, कोयनेतील वीज म्हणजे सर्वस्व नाही हे लक्षात घ्यावे लागेल. कोयना धरण बांधल्यापासून वीजनिर्मितीचे अन्य अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे विजेच्या हव्यासापोटी कोयनेत अवास्तव पाणीसाठा करणे धोकादायक आहे. कोयना आणि चांदोली धरणे निर्मितीपासून  आजवर एकदाही रिकामी राहिलेली नाहीत. प्रत्येक वर्षी पुरेसा पाऊस झाला आहे, त्यामुळे ३१ मे रोजी १० टक्केच पाणीसाठा ठेवावा यासाठी समिती आग्रही आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणelectricityवीजfloodपूर