शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडी नगराध्यक्षपदासाठी भाजप-शिंदेसेना आमने-सामने, राष्ट्रवादी अजित पवार गट ‘किंगमेकर’ ठरणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 19:37 IST

Local Body Election: पहिलीच थेट निवडणूक चुरशीची, समीकरणे बदलणार

लक्ष्मण सरगरआटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचेच घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने शहरातील राजकारण तापले आहे. भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील सरळ लढत ही केवळ नगराध्यक्ष पदापुरती मर्यादित न राहता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे.आटपाडी नगरपंचायत स्थापन होऊन तीन वर्षे होत असली तरी आता पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे ही निवडणूक ‘प्रतिष्ठेची’ बनली आहे. ग्रामपंचायत काळात शिंदे सेनेचे नेते व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांच्या गटाने सरपंचपद मिळवत सत्ता राखली होती. मात्र, सरपंच एका गटाचा आणि सदस्य दुसऱ्या गटाचे असल्याने विकासकामांवरून सातत्याने राजकीय संघर्ष होत होता. आता ही लढाई थेट महायुतीच्या अंगणात पोहोचली आहे.आटपाडी शहरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ ब्रह्मानंद पडळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख, शिंदे सेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, स्वाभिमानी गटाचे नेते भारत पाटील, आनंदराव पाटील आणि आरपीआयचे राजेंद्र खरात आदी नेत्यांची समीकरणे आता बदललेली दिसत असून, यामुळे निवडणुकीत अनपेक्षित गठबंधन होण्याची शक्यता आहे.भाजपचा पडळकर व देशमुख गट हातमिळवणीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे, तर शिंदे सेनेचे तानाजी पाटील स्वतंत्रपणे मैदानात उतरतील अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) सध्या निरीक्षकाच्या भूमिकेत असून, भाजपा व शिंदेसेनेच्या नाराज कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढून तिसरा पर्याय निर्माण करणार का? हे लवकरच समजेल.

समीकरणे बदलणारआटपाडी नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक चुरशीची ठरणार असून, पारंपरिक विरोधकांमध्येच ही निवडणूक पार पडणार का? का अन्य समीकरणे पहायला मिळणार? महायुतीतीलच दोन गट आमनेसामने आल्याने ही लढत तालुक्यापलीकडे जाऊन जिल्हास्तरावर चर्चेचा विषय बनली आहे. कोणाचा गट नगरपंचायतीवर झेंडा फडकवणार आणि राष्ट्रवादीची चाल कोणाला फायद्याची ठरणार? हे पाहणे आता राजकीय वर्तुळासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP-Shinde Sena face-off in Atpadi; NCP could be kingmaker.

Web Summary : Atpadi Nagar Panchayat sees a BJP-Shinde Sena clash for president post. NCP's role crucial, potentially influencing future local elections amid changing alliances.