शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तीन वर्षीय जिजाने सर केला 'कर्नाळा', अवघ्या एक तास ५४ मिनिटांत केली चढाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:52 IST

चिमुकलीचे अतुलनीय शौर्य; परिसरात कौतुक 

सहदेव खोत पुनवत : शिराळे खुर्द ता. शिराळा येथील सागर विश्वास पाटील यांच्या तीन वर्षीय जिजा नावाच्या चिमुकलीने पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ला अवघ्या एक तास ५४ मिनिटांमध्ये चालत चढाई करत सर केला. तिच्या या अतुलनीय शौर्याचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.शिराळे खुर्द येथील सागर विश्वास पाटील हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. ते आपली पत्नी अश्विनी आणि मुलगी जिजा यांच्यासह मुंबईत वास्तव्यास आहेत. सागर पाटील दरवर्षी आपल्या मुलीचा वाढदिवस गडकिल्ल्यावर जाऊन साजरा करतात. यानिमित्ताने ते आपल्या मुलीला गड किल्ल्यांची माहिती देतात. शनिवारी (दि.२२) सकाळी दहा वाजता सागर आपल्या पत्नी आणि मुलीसह कर्नाळा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले. तेथून या तीन वर्षाची चिमुकलीसह त्यांनी कर्नाळा किल्ल्याची चढाई सुरू केली.जिजा मोठ्या उत्साहाने गड चढत होती. अडचणीची वाट, तीव्र चढण, धोकादायक परिसर असूनही ती अत्यंत धैर्याने गड सर करत होती. एक तास ५४ मिनिटांचा वेळ घेत तिने पायी चालत हा गड सर केला. तिचे हे अतुलनीय शौर्य पाहून अनेक ट्रेकर्सनी तिचे अभिनंदन केले. काहींनी तर तिच्या चढाईची रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल केली. कोणतेही प्रशिक्षण नसताना अगदी कमी वयात कर्नाळा किल्ला तिने सर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.जिजाला लहान वयापासूनच गड किल्ल्यांची आवड निर्माण झाली असून तिने अनेक किल्ल्यांवर भ्रमंती केली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील ही मुलगी लहान वयापासूनच ट्रेकिंग करत लक्षवेधक कामगिरी करत आहे त्यामुळे शिराळा तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीFortगडpanvelपनवेल