शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

सांगलीतील कवलापूर विमानतळासाठी राज्य शासनाची तत्त्वत: मंजुरी, उद्योगमंत्र्यांनी दाखविला हिरवा कंदिल

By अविनाश कोळी | Updated: July 5, 2023 19:19 IST

जमीन वर्ग करण्यात येणार

सांगली : राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कवलापूर (ता. मिरज) येथील विमानतळास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. विमानतळासाठी भूसंपादनाबाबतही लवकर निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.मुंबईत सामंत यांच्या उपस्थितीत कवलापूर विमानतळासंदर्भात बैठक झाली. या बैठकीसाठी खानापूरचे आमदार अनिल बाबर उपस्थित होते. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांची ऑनलाईन उपस्थिती होती.गेली अनेक वर्षे कवलापूर येथे विमानतळ व्हावे, यासाठी सांगलीची जनता आग्रही आहे. सांगलीतील सर्वपक्षीय कृती समितीमार्फत गेल्या काही दिवसांपासून सतत पाठपुरावाही सुरू आहे. ज्योतिरादित्य शिंदे, रस्ते वाहतूक महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊनही लोकप्रतिनिधींनी विमानतळाबाबत मागणी केली होती. मुंबईतील बैठकीत कवलापूर येथे विमानतळासाठी तत्त्वतः मंजुरी दिली असून, भूसंपादनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.बैठकीत गाडगीळ म्हणाले की, सांगलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि कृषिपूरक उद्योगांच्या विकासासाठी कवलापूर येथे विमानतळ होणे गरजेचे आहे. सांगलीकरांची अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे.जमीन वर्ग करण्यात येणारएमआयडीसीकडील जमीन विमानतळ विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, यापुढील सर्व कारवाई विमानतळ विभागाचे अधिकारी पूर्ण करतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.निविदा निघेपर्यंत पाठपुरावा करूकवलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर व पृथ्वीराज पवार म्हणाले की, शासनाने विमानतळासाठी तत्त्वत: मंजुरी दिली. या गोष्टीचे स्वागत आहे. मात्र, आमची समिती या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. जोपर्यंत जादाची जागा हस्तांतर होत नाही व निविदा निघत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहणार आहोत.

टॅग्स :SangliसांगलीAirportविमानतळ