शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खंडनाळ येथे विवाहित महिलेचा आर्थिक देवाण-घेवाणीतून खून, विहीरीत मृतदेह आढळला; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2024 22:21 IST

दरीबडची : खंडनाळ (ता.जत) येथे विवाहित महिलेच्या खून प्रकरणाचा चार दिवसांनी छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले. उसने घेतलेले ...

दरीबडची : खंडनाळ (ता.जत) येथे विवाहित महिलेच्या खून प्रकरणाचा चार दिवसांनी छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले. उसने घेतलेले चार लाख रुपये परत दिले नाही म्हणून डोक्यात मारुन बेशुध्द झाल्यावर विहीरीत टाकून तिचा खून  झाल्याचे निष्पन्न झाले. मयत इंदु पांडुरंग बिराजदार (वय ४०) असे विवाहित महिलेचे नांव आहे.  ही घटना सोमवारी दि.८ रोजी रात्री १० वाजता घडली होती. तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजता विहीरीत आढळून आला. याप्रकरणी तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१ रा खंडनाळ) याला अटक करण्यात आली आहे.   याबाबतची माहिती अशी की, पूर्व भागातील खंडनाळ येथील पाटील वस्तीवर मयत इंदु पांडुरंग बिराजदार या कुंटुंबासमवेत रहातात. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मयत इंदुमती व तिची लहान मुलगी प्रतिक्षा या दोघी आवटी वस्तीवर नातेवाईकांच्या लहान बाळाला बघायला गेली होती.   घराजवळील रस्त्यावरुन मुलीला घरी पाठविले. रस्त्यावरुन कुणाला भेटायला गेली होती. ती घरी रात्री आली नाही. मुलगा बबलू याची गावात दूध संकलन केंद्र आहे. संकलन केंद्र बंद करुन आल्यावर आई घरी आली नाही म्हणून फोन केला. परंतु फोन लागला नाही. फोन बंद  होता. तिचा रात्री वस्तीवर शोध घेतला असता मिळून आली नाही. तिचा मृतदेह घरापासून अर्धा कि.मी अंतरावर तुकाराम कुलाळ यांच्या विहीरीत बुधवारी तीन वाजता आढळून आला.चार लाख रूपये उसने दिले होते ते पैसे परत देत नाही म्हणून  विहीरीजवळ बाजरीत झटपट झाली.डोक्यात मारुन बेशुद्ध झाल्यावर विहीरीत टाकुन तिचा खून केल्याचे कबुल केले.आरोपी  गुन्हा केलेपासुन फरार होता.आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथक नेमले होते. महाराष्ट्र कर्नाटक सिमाभागात राहून त्याचे अस्तित्व लपवत होता. परंतु तपास पथकाने शिताफीने व कसोशीने प्रयत्न करुन मोटेवाडी ,पांडोझरी भागात असल्याची माहिती गोपनिय बातमीदारामार्फत मिळाली.आरोपीला अटक केली. मयताच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.मृतदेह विहीरीत फेकून दिला.चोरीच्या उद्देशाने खून केला असावा.असा बनाव केला.विहीरीवर चप्पल, कपडे मिळून आले. मृतदेह टाकलेली विहीर निर्जन ठिकाणी आहे. विहीरीच्या बाजूला कच-याचा मोठा ठिगारा आहे. सहजासहजी दिसत नाही.रानात पेरणी केल्याने कोण जात नाही.त्यामुळे आरोपीने ठिकाण निवडलेले असावे.असा अंदाज आहे.    तिचा पति पांडुरंग मुंबई येथे गोदीत हमाली माथाडी मजूर आहेत.मुलगी मुंबई पोलीस,दुसरी मुलगी पोलीस भरती गुणवत्ता निवड यादीत आहे.मुलगी बबलू दूध संकलन केंद्र आहे.  फिर्याद मुलगी प्रतिक्षा पांडुरंग बिराजदार (वय-१६) यांनी  दिली.आरोपीवर उमदी पोलिस ठाण्यात अपराध क्र आणि कलम गुरनं १८४ भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ (१) गुन्हा नोंद झाला आहे.     पोहेकॉ  संतोष माने, वहीदा मुजावर,आप्पासाहेब हाके अगतराव मासाळ ,मनिष कुमरे सोमनाथ पोटभरे, दशरथ कोकाटे,आप्पासाहेब  घोडके सुदर्शन खोत यांनी तपास केला.अधिक तपास उमदी पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.आरोपीला सात दिवसाची पोलिस कोठडी:   आरोपी तम्मा कुलाळला जत न्यायालयाने दि.१९ पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. खूनात आणखी कुणाचा सहभाग आहे काय,नेमके कारण,खून करुन कोठे होता.याचा तपास होणार असल्याची माहिती हवलदार आप्पासाहेब हक्के यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस