विराजदादांची स्वकर्तृत्वाची छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:29 IST2021-09-22T04:29:14+5:302021-09-22T04:29:14+5:30
युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडत असताना अनेक नवोपक्रम, नवनिर्मितीच्या संकल्पना त्यांनी युवकांपुढे मांडल्या आहेत. दादांच्या ...

विराजदादांची स्वकर्तृत्वाची छाप
युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडत असताना अनेक नवोपक्रम, नवनिर्मितीच्या संकल्पना त्यांनी युवकांपुढे मांडल्या आहेत. दादांच्या संपर्कात आल्यापासून त्यांचा नम्रपणा, स्पष्टवक्तेपणा, कर्तव्यपरायणता, प्रकर्षाने जाणवते. समाजकारणातून राजकारण करत असताना भविष्याचा वेध घेणाऱ्या अनेक संकल्पना त्यांनी मांडल्या आहेत. तसेच अंमलबजावणीसाठीदेखील ते स्वतः लक्ष घालत आहेत. दादांचा स्त्रियांविषयी आदर हा पावलोपावली जाणवतोच. त्यांना राजकीय अंगणातच बाळकडू पाजले गेल्याने आदरणीय सुनीता वहिनींच्या संस्कारात आणि दूरदृष्टी व खंबीर नेतृत्वाचा वारसा असणाऱ्या आदरणीय मानसिंगभाऊ यांच्या मार्गदर्शनात ते वाढले आहेत. त्यामुळे आपोआपच एक सुसंस्कारी आणि स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व घडत गेले आहे. अगदी कमी वेळात युवकांचे प्रेरणास्थान विराजदादा ठरले आहेत. आजची युवा पिढी अतिशय उत्साही असताना दिसते. पक्षीय कार्य, सुयोग्य कार्य पद्धती, मतदारसंघाची बांधणी आणि उत्कृष्ट संघटन कौशल्य, भागातील सद्यपरिस्थितीचा डोळसपणे अभ्यास करण्याची वृत्ती या सर्व गोष्टी आत्मसात करत विराजदादा लवकरच राजकीय प्रवासातील महत्त्वाचे टप्पे गाठत राजकीय क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करतील यात शंका नाही. कोविड-१९ या संसर्गजन्य विषाणूमुळे संपूर्ण जग स्तब्ध झाले होते. अशा वेळी खऱ्या अर्थाने विराजदादांनी जनतेला आधार देण्याचं काम केलं. जिल्ह्याला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभा होतात, तेव्हा राजकारणापलीकडचा माणूस म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांच्या राजकीय जाणिवा विकसित केलेल्या दिसून येतात. मतदारसंघातील प्रश्न समस्या कितीही लहान असले तरी त्या सोडवण्याची धडाडी, तत्परता दादांच्या स्वभावात दिसून येते. मला अभिमान वाटतो की अशा समाजाप्रति अस्था, भविष्याचा वेध घेण्याची वृत्ती आणि स्त्रियांविषयी प्रचंड आदर असणाऱ्या युवा नेतृत्वासोबत काम करण्याची संधी मला मिळत आहे. गेल्या जवळपास सहा वर्षांपासून समाजकारणात आणि गेल्या तीन वर्षांत राजकारणात ठसा उमटवणाऱ्या दादांचे शिक्षण, कार्य, जनसंपर्क बघून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे, ती जबाबदारी समर्थपणे पेलत आहेत. युवकांना एकत्रित करणे, त्यांचे संघटन करणे, त्यांना प्रगतीच्या योग्य दिशेवर नेणे, केवळ राजकीय दृष्टिकोनातून नव्हे तर खऱ्या अर्थाने क्रियाशील करत आहेत. त्यामुळे ते युवकांचे प्रेरणास्थान ठरले आहेत.
आपल्या तालुक्याचे कार्यकुशल आमदार मानसिंगभाऊंनी नेहमीच वक्तृत्वापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवला आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघात, ते समाजकारणाला त्यांनी प्राधान्य दिले आहे. कारणातून राजकारण करत व अर्थकारणाचा ध्यास घेत, सहकार क्षेत्रातील उद्योग व्यवसायांना सोनेरी दिवस आणले आहेत. आपल्या तालुक्याला समृद्ध केले. त्यांच्या या कार्याला योग्य ती खंबीर साथ देण्यासाठी यशस्वी पावले विराजदादांनी उचलली आहेत. भविष्यात भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवत दादादेखील एक आदर्श नेतृत्व म्हणून स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व म्हणून आपणास पाहायला मिळतील. आपल्या भागातील सुसंस्कृत राजकारणाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवतील. येणाऱ्या पिढीला औद्योगिक दृष्टिकोनातून सक्षम करतील याची मनस्वी खात्री वाटते.
- सौ. साधना राजाराम पाटील
अध्यक्ष, शिराळा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस