शरद पवार यांचा स्वकर्तृत्वातून राजकारणात ठसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:45+5:302021-01-02T04:22:45+5:30

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार ...

Impression of Sharad Pawar in politics through spontaneity | शरद पवार यांचा स्वकर्तृत्वातून राजकारणात ठसा

शरद पवार यांचा स्वकर्तृत्वातून राजकारणात ठसा

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयात राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकार संघाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘सहकारी जगताची आठ दशके कृतज्ञतेची’ या मासिकाच्या विशेषांकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी प्रादेशिक सहकार संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल साताऱ्याचे राजेंद्र लवांगरे यांचा श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. सूरज चौगुले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी वारणा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्राचार्य एच. वाय. करांडे, विश्वस्त सयाजी पाटील, आप्पासाहेब खराडे, जगन्नाथ पाटील, सुभाष पाटील, पंढरीनाथ पाटील, बी. बी. पाटील, सर्जेराव माने आदींसह मान्यवर उपस्थित होते,

फोटो-०१कुरळप१

फोटो ओळ :

ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे सहकार संघाच्या मासिकाचे प्रकाशन खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रताप पाटील, राजेंद्र लवांगरे, बाबासाहेब पाटील, एच. वाय. करांडे आदी उपस्थित होते.

Web Title: Impression of Sharad Pawar in politics through spontaneity