नव कृष्णा व्हॅली चित्रकला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत ‘जीवनातील कलेचे महत्त्व’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कला ही जीविका असते व पैसा मिळविणे ही उपजीविका असते. कल्पनेला आकार देणारे कलाकार आज उपजीविकेसाठी जीविकेचा बाजार मांडतात, हे दुर्दैवी आहे. विधान परिषदेत कलाकारांसाठी जागा राखीव आहेत; पण अलीकडे राजकारण हीच कला झाल्याने तिथे नकलाकारांची नेमणूक होते, ही शोकांतिका आहे. आज शाळांमध्ये चित्रकला विषय आहे; पण शिक्षकाची तरतूद नाही. हे चित्र विदारक आहे. कला ज्याच्याकडे आहे त्याला व ज्याच्याकडे नाही त्यालाही निखळ आनंद देते.
यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, निरंजन आवटी, आनंदा देवमाने, गणेश माळी, पांडुरंग कोरे, नामदेव भोसले उपस्थित होते. प्राचार्य एस. के. पैलवान यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष पॉल यांनी स्वागत केले. सूर्यकांत होळकर, बाबासाहेब आळतेकर यांनी संयोजन केले.