अरुण चव्हाण यांचे उपेक्षितांसाठी महत्त्वपूर्ण काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:37+5:302021-06-03T04:19:37+5:30
सांगलीतील वेरळा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना बुधवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ऑनलाईन आदरांजली ...

अरुण चव्हाण यांचे उपेक्षितांसाठी महत्त्वपूर्ण काम
सांगलीतील वेरळा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना बुधवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ऑनलाईन आदरांजली वाहिली.
आमदार अनिल बाबर म्हणाले की, अरुण चव्हाण यांनी दुष्काळी भागात केलेली कामे दिशादर्शक होती. खानापूर तालुक्यातील आळसंद परिसरात केलेली विकासकामे आजही लोकांना ज्ञात आहेत.
आमदार अरुण लाड म्हणाले, जी. डी. बापू आणि प्रा. अरुण चव्हाण यांचे ५० वर्षांपासून चांगले संबंध होते. मी त्यांचा विद्यार्थी होतो. त्यांनी सुरू केलेली अरुणोदय पाणीपुरवठा संस्था मध्यंतरी बंद होती. ती पूर्ववत केली आहे.
साताऱ्याच्या सोनाली पोळ म्हणाल्या की, माझे माहेर खानापूर तालुक्यातील वाझर. तेथे मी लहान असताना अरुण चव्हाणांनी जलसंधारणाची कामे सुरू केली होती. त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही माण तालुक्यात कामे केली आहेत.
राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, भाई संपतराव पवार, ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, प्रा. अविनाश सप्रे, न्यू अरुणोदय पाणीपुरवठा संस्थेचे संग्राम जाधव यांनीही आदरांजली वाहिली.
डॉ. प्रशांत थोरात यांनी संयोजन केले.
यावेळी प्रा. डॉ. विजय पाटील, सरपंच इंदुमती जाधव, जयसिंगराव कदम, कॉ. दिलीप सव्वाशे, हिंमत जाधव, नितीन जाधव, अरुण जाधव, सुरेश पाटील, जयसिंग कुंभार, वर्षा गायकवाड, धनंजय कुलकर्णी, डॉ. जाई कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो : अरुण चव्हाण यांचा वापरणे.