पाणीपट्टीसाठी अभय योजना राबवा : पृथ्वीराज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:48 IST2021-03-13T04:48:00+5:302021-03-13T04:48:00+5:30

फोटो ओळी :- महापालिका हद्दीतील पाणीपट्टीमध्ये सवलत योजना चालू करावी, या मागणीचे पत्र काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ...

Implement Abhay Yojana for water supply: Prithviraj Patil | पाणीपट्टीसाठी अभय योजना राबवा : पृथ्वीराज पाटील

पाणीपट्टीसाठी अभय योजना राबवा : पृथ्वीराज पाटील

फोटो ओळी :- महापालिका हद्दीतील पाणीपट्टीमध्ये सवलत योजना चालू करावी, या मागणीचे पत्र काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांना दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : महापालिका क्षेत्रात मालमत्ता कराच्या धर्तीवर पाणीपट्टीमध्ये दंड, शास्तीची अभय सवलत योजना राबवावी, अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली.

याबाबत आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले. पाटील म्हणाले की, महापालिकेने मालमत्ता करात दंड, शास्ती, व्याज थकीत असलेल्या ग्राहकांसाठी शंभर टक्के सवलतीची अभय योजना राबवली आहे. त्याच धर्तीवर पाणीपट्टीत दंड, शास्ती, व्याज थकीत असलेल्या ग्राहकांसाठी अभय योजना राबवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. याबाबत आयुक्तांशी चर्चा केली. त्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याची ग्वाही दिली आहे.

यावेळी नगरसेवक संजय मेंढे, माजी नगरसेवक अल्ताफ पेंढारी, इरफान शिकलगार, सनी धोत्रे, अजय देशमुख, विजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Implement Abhay Yojana for water supply: Prithviraj Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.