झाडे लावून रक्षाविसर्जनाच्या अस्थीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:32 IST2021-02-25T04:32:44+5:302021-02-25T04:32:44+5:30

आंबेवाडी (ता. शिराळा) येथे अस्थींचे विसर्जन शेतात झाडे लावून करण्यात आले. यावेळी सुकन्या धुमाळ, श्रीरंग पाटील, बजरंग पाटील, सुरेश ...

Immersion of Rakshavisarjan bones by planting trees | झाडे लावून रक्षाविसर्जनाच्या अस्थीचे विसर्जन

झाडे लावून रक्षाविसर्जनाच्या अस्थीचे विसर्जन

आंबेवाडी (ता. शिराळा) येथे अस्थींचे विसर्जन शेतात झाडे लावून करण्यात आले. यावेळी सुकन्या धुमाळ, श्रीरंग पाटील, बजरंग पाटील, सुरेश धुमाल उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : मारुती दाजी मोरे दादा बालविकास मंदिर इस्लामपूरचे मुख्याध्यापक सुनील विश्वास धुमाळ यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने वयाच्या ७९ वर्षी निधन झाले. कुटुंबीयांनी त्यांच्या रक्षा नदीत विसर्जन न करण्याचा निर्णय घेतला. शेतात झाडे लावून त्या ठिकाणी रक्षा विसर्जित करण्यात आल्या. तसेच इतर कार्याच्या वेळी पुस्तकांचे वाटप करून एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. हा सर्व कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी आंबेवाडी (ता. शिराळा) याठिकाणी झाला. यावेळी सुकन्या धुमाळ, श्रीरंग पाटील, बजरंग पाटील, सुरेश धुमाळ, तानाजी धुमाळ, दिलीप धुमाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Immersion of Rakshavisarjan bones by planting trees