मिरजेत २१५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:51+5:302021-09-21T04:28:51+5:30

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केवळ गणपती बाप्पांचा जयघोष व टाळ्यांच्या गजरात विसर्जन पार पडले. फिरत्या जलकुंडात घरगुती ...

Immersion of Ganesha in 215 circles in Miraj | मिरजेत २१५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन

मिरजेत २१५ मंडळांच्या गणेशाचे विसर्जन

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर केवळ गणपती बाप्पांचा जयघोष व टाळ्यांच्या गजरात विसर्जन पार पडले. फिरत्या जलकुंडात घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन झाले. मूर्तीदान उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाला.

रविवारी सकाळी साडेदहा वाजता विसर्जनास प्रारंभ झाला. दिवसभर सार्वजनिक मंडळांच्या गणेशाचे विसर्जन सुरू होते. कृष्णाघाट व गणेश तलावात महापालिकेने विसर्जनाची व्यवस्था केली होती. कृष्णाघाटावर १५ व गणेश तलावात दोनशे मंडळांच्या गणेशाच्या विसर्जनाचा समारोप रविवारी रात्री १२ वाजता झाला.

विसर्जनस्थळी गर्दीस प्रशासनाने प्रतिबंध केला होता. घरगुती मूर्ती विसर्जनासाठी एक फिरते जलकुंड व प्रमुख चाैकात जलकुंभ व मूर्तीदान केंद्रांची व्यवस्था होती. सलग दुसऱ्यावर्षी स्वागत कमानी, मिरवणूक व वाद्यांशिवाय गणेशोत्सव पार पडला.

चाैकट

प्रशासनाचे निर्बंध

मंडळांच्या गणेशाच्या विसर्जनासाठी गणेश तलाव व कृष्णाघाटावर सोय केली होती. मात्र प्रशासनाने येथेही मर्यादीत कार्यकर्त्यांच्या उपस्थितीतच विसर्जन करण्यास परवानगी दिली. प्रत्येकी मंडळासोबत केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी होती.

चाैकट

मिरवणूक मार्गावर पोलीस बंदोबस्त

सलग दुसऱ्यावर्षी गणेश विसर्जन मिरवणूक रद्द झाल्याने पोलिसांचा ताण कमी झाला होता. दरवर्षीच्या तुलनेत पोलीस बंदोबस्त कमी होता. पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पोलीस उपअधीक्षक, ४८ अधिकारी, ४५० पोलीस कर्मचारी, ९० गृहरक्षक असा बंदोबस्त होता.

चाैकट

बैलगाडी मिरवणुकीचे आकर्षण

अनेक मंडळांनी विद्युत रोषणाई व फुलांची सजावट केली होती. वाद्यांशिवाय मिरवणूक असल्याने काही कार्यकर्त्यांनी मोबाईलवर गाणी वाजविली. काहींनी वाहनांचा हाॅर्न व काहींनी पिपाण्या वाजवत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मंडळांनी ट्रॅक्टरमधून व रथातून गणेशाची मिरवणूक काढली. नदिवेस गणेशोत्सव मंडळाची बैलगाडी मिरवणूक आकर्षण ठरली.

Web Title: Immersion of Ganesha in 215 circles in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.