शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:51 IST

Corona vaccine JayantPatil Sangli : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोवीड लस दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

ठळक मुद्देमेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने लस देऊ : जयंत पाटीलधनगर समाजाच्या शिष्टमंडळाला ग्वाही

विटा (सांगली) : उदरनिर्वाहासाठी राज्यातील मेंढपाळ धनगर समाज भटकंती करीत रानोमाळ फिरत असतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्य शासन पुढाकार घेऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोवीड लस दिली जाईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजूशेठ जानकर यांनी मेंढपाळ व्यवसायासाठी भटकंती करणाऱ्या धनगर समाज बांधवांना तातडीने लस देण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. जानकर म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे धनगर समाज बांधव संकटात सापडला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरानाने बळी जाणाऱ्याची संख्याही लक्षणीय आहे.वाढत्या कोरोनामुळे हातावर पोट भरणाऱ्या मेंढपाळ धनगर समाज बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळ धनगर समाजबांधवांची संख्या आहे. वर्षातील आठ महिने मेंढपाळ गावातून बाहेर पडून भटकंती करीत असतात. त्यामुळे शासनाने याकडे गांभिर्यापूर्वक लक्ष देऊन मेंढपाळ धनगर समाज बांधवांना तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी, अशी मागणी राजूशेठ जानकर यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी मेंढपाळ धनगर समाज बांधवांना लस देण्यासाठी शासन पातळीवर तातडीने निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही दिली. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJayant Patilजयंत पाटीलSangliसांगली