लिंगनूरमध्ये साडेसहा लाखांची अवैध वाळू, ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:04 IST2020-12-05T05:04:56+5:302020-12-05T05:04:56+5:30

याप्रकरणी प्रमोद शिवाजी देवकुळे (वय ३३, रा. सांगलीवाडी), किरण रणदिवे आणि किरण पाटील (दोघे रा. कारंदवाडी, ता. वाळवा) यांच्याविरुद्ध ...

Illegal sand and trucks worth Rs 6.5 lakh seized in Lingnur | लिंगनूरमध्ये साडेसहा लाखांची अवैध वाळू, ट्रक जप्त

लिंगनूरमध्ये साडेसहा लाखांची अवैध वाळू, ट्रक जप्त

याप्रकरणी प्रमोद शिवाजी देवकुळे (वय ३३, रा. सांगलीवाडी), किरण रणदिवे आणि किरण पाटील (दोघे रा. कारंदवाडी, ता. वाळवा) यांच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी प्रमोद देवकुळे हा किरण रणदिवे यांच्या मालकीच्या ट्रकमधून लिंगनूर येथून सलगरेकडे ६ लाख ३० हजार रुपये किमतीची ४ ब्रास वाळू घेऊन जात होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर मिरज ग्रामीण पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन विनापरवाना वाळू वाहतूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध मिरज गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

Web Title: Illegal sand and trucks worth Rs 6.5 lakh seized in Lingnur