शेगावात बेकायदा दारू विक्री; एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:22 IST2021-05-03T04:22:02+5:302021-05-03T04:22:02+5:30
संख : शेगाव (ता. जत) येथे कामगार दिनानिमित्त ड्राय डे असतानाही दारू विक्री करणाऱ्या विलास गोपीनाथ शिंदे (वय ४२) ...

शेगावात बेकायदा दारू विक्री; एकास अटक
संख : शेगाव (ता. जत) येथे कामगार दिनानिमित्त ड्राय डे असतानाही दारू विक्री करणाऱ्या विलास गोपीनाथ शिंदे (वय ४२) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून दोन हजार ८१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आली. याबाबत जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
शेगाव येथे पोलीस पथक गस्तीवर असताना शिवनेरी बीअर बारजवळ दारू विक्री सुुरू असल्याची माहिती पथकास मिळाली. पाेलिसांनी छापा टाकला असता विलास शिंदे याच्याकडे देशी विदेशी कंपनीच्या १७ सीलबंद बाटल्या आढळून आल्या. त्यांची किंमत दोन हजार ८१५ रुपये आहे. पाेलिसांनी विलास शिंदे याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.