मिरज पश्चिम भागात बेकायदा दारूविक्री, जुगारावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:44+5:302021-02-06T04:47:44+5:30
सांगली : कर्नाळ, नांद्रे, तुंग, मौजे डिग्रज या गावात सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीवर व जुगार घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात ...

मिरज पश्चिम भागात बेकायदा दारूविक्री, जुगारावर कारवाई
सांगली : कर्नाळ, नांद्रे, तुंग, मौजे डिग्रज या गावात सुरू असलेल्या बेकायदा दारू विक्रीवर व जुगार घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. या विविध कारवायांमध्ये पोलिसांनी देशी दारूच्या आठ हजार रुपये किमतीच्या २४० बाटल्या, ३ हजार ६५० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. सांगली ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
या कारवाईत तुंग येथे जंबू बिरनाळे याच्याकडून बेकायदा देशी दारू जप्त करण्यात आली. कवठेपिरान येथे फिरोज बालेचंद लतीफ, विलास गर्जे-पाटील यांच्याकडून १७०० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले, तर नांद्रे येथे रवींद्र बंडू यादव, कुमार पाचोरे यांच्याकडून १३०० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. कर्नाळमध्ये सागर आनंदा मोहिते व आदम पठाण यांच्याकडून ६५० रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत बेदरे, सहायक फौजदार आप्पा कांबळे, प्रमोद खाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.