तासगावात दीड लाखाची अवैध दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:41 IST2020-12-16T04:41:36+5:302020-12-16T04:41:36+5:30

ओळ : तासगाव येथे अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यास पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या पथकाने अटक केली. - तासगाव : ...

Illegal liquor worth Rs 1.5 lakh seized in Tasgaon | तासगावात दीड लाखाची अवैध दारू जप्त

तासगावात दीड लाखाची अवैध दारू जप्त

ओळ :

तासगाव येथे अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्यास पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या पथकाने अटक केली.

-

तासगाव : उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या विशेष पथकाने मंगळवारी दुपारी १ लाख ४५ हजार ४८४ रुपयांचा देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी राजेंद्र पांडुरंग माईनकर (वय ५१, रा. पागा गल्ली तासगाव) याच्याविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दारू वाहतुकीसाठी वापरली जाणारी रिक्षाही जप्त केली आहे.

तासगाव पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना कैलास लॉजसमाेर विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारी रिक्षा अडविण्यात आली. रिक्षामध्ये १ लाख ४५ हजार ७८४ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा आढळला. हा दारूसाठा व रिक्षा जप्त करुन राजेंद्र पांडुरंग माईनकर याच्याविराेधात तासगाव पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.

फाेटाे : १५ तासगाव २

Web Title: Illegal liquor worth Rs 1.5 lakh seized in Tasgaon